Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नवा गडी नव राज्य’ मालिका निर्णायक वळणावर,चिंगी आनंदीचा आई म्हणून करणार का स्वीकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:29 IST

चिंगीला शाळेत आनंदी तुझी सावत्र आई म्हणून चिडवायला सुरुवात होते. त्यामुळे चिंगी खूपच दुखावते आणि त्याचे परिणाम घरी दिसू लागतात.

झी मराठी’ वाहिनीवरील काही दिवसांपूर्वी सुरु झालेली नवा गडी नवं राज्य या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेतील कथानक आणि त्यात येणारे ट्वीस्ट हे सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असं ठेवण्यात आलं आहे. 

 या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते-केळकर रमाची भूमिका साकारते आहे. रमाचा मृत्यू झाला आहे. तिचा नवरा राघव दुसरं लग्न करून आनंदीला घरात आणतो.

दरम्यान चिंगीला शाळेत आनंदी तुझी सावत्र आई म्हणून चिडवायला सुरुवात होते. त्यामुळे चिंगी खूपच दुखावते आणि त्याचे परिणाम घरी दिसू लागतात. चिंगीची चीड चीड सुरु होते. चिंगी आणि आनंदी मध्ये राघवच्या निमित्ताने खूप वाद होतात आणि चिंगी आनंदी पासून दुरावते.

 चिंगीला तिच्या आईची म्हणजेच रमाची खूप आठवण येतेय. आनंदी चिंगीशी सर्वतोपरी बोलण्याचा प्रयत्न करतेय पण चिंगी रुसलेय आतून दुखावलेय. राघव दोघांमध्ये पुन्हा मैत्री करण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्यात राघव आनंदीच्या अधिकच जवळ येतो! आता राघवला आनंदीच्या प्रेमाची जाणीव होणार का? आनंदी चिंगी मधला अबोला संपणार का? चिंगी आनंदीला आई म्हणून स्वीकारेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :झी मराठी