Join us
Daily Top 2Weekly Top 5

नौशीनला खलनायिका बनायचे नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:41 IST

कुसुम या मालिकेमुळे नौशिन अली सरदार हे नाव घराघरात पोहोचले. तिने या मालिकेनंतर काही चित्रपटांमध्येही काम केले होते. सध्या ...

कुसुम या मालिकेमुळे नौशिन अली सरदार हे नाव घराघरात पोहोचले. तिने या मालिकेनंतर काही चित्रपटांमध्येही काम केले होते. सध्या ती गंगा या मालिकेत झळकत आहे. एक कलाकाराने सगळ्या प्रकारच्या भूमिका साकाराव्यात असे कलाकाराला वाटत असते. पण खलनायिकेची भूमिका करणे साकारणे नौशीनला आवडत नाही. कलाकाराने एकाच साच्यात अडकू नये ही गोष्ट नौशीलना पटते. पण खलनायिका साकारल्यास त्या गोष्टीचा आपल्याही आयुष्यावर परिणाम होतो असे नौशीनचे म्हणणे आहे. पण एखाद्या चित्रपटात अथवा मालिकेत काही भागांपुरता खलनायिकेची भूमिका साकारायची असल्यास काही हरकत नाही असे ती सांगते.