Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती विवेक दहियाच्या शर्टलेस फोटोंवर नेटीझन्सने केल्या कमेंट,तर दिव्यांकाने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 08:00 IST

टीव्ही कपल विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.यावेळी कारणही जरा वेगळेच आहे.हे कपल पुन्हा चर्चेत ...

टीव्ही कपल विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.यावेळी कारणही जरा वेगळेच आहे.हे कपल पुन्हा चर्चेत येण्यासाठी कारणीभूत ठरला आहे विवेकचा शर्टलेस फोटो. दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात.त्यांच्या कामाव्यतिरिक्तही खाजगी  घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.इतर सेलिब्रेटींप्रमाणे हे कपलही त्यांचे खास फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. असाच एक शर्टलेस फोटो विवेकने सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोत त्याची पिळदार बॉडी पाहायाला मिळते आहे.हा फोटो शेअर होताच त्याला खूप सारे कमेंटस आणि लाइक्स मिळत आहे.  तर या फोटोला पाहताच काही तरूणींनी त्याला चक्क लग्नासाठी प्रपोज केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंवर अनेक तरूणी फिदा होत असून आतापर्यंत  39,639हूनही अधिक लाइक्स या फोटोला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोवर जास्त कमेंटस या तरूणींच्या आहेत हे पाहून दिव्यांकानेही  ‘ No Touching, No Touching, Only Seeing, Only Seeing’ असा कॉमेडी रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे दिव्यांकापेक्षा विवेक दहियाचा फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत असून  सोशल मीडियावर दिव्यांकाच्या नाहीतर पती विवेक दहियाचाच जास्त बोलबाल असल्याचे पाहायला मिळत आहे.

आपल्या जोडीदाराला छानसे सरप्राईज देण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नानंतरचा पहिला व्हेलेंटाईन त्यांनी खूप उत्साहात साजरा केला होता.विवेकने व्हेलेंटाईन डेला दिव्यांकाला एक खूप छान सरप्राईज प्लान केले होते. विवेक दिव्यांकाला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला गेला होता.विवेक नेहमीच दिव्यांकाला काही ना काही तरी सरप्राईज देत असतो. गोव्याचे सरप्राईजही दिव्यांकासाठी खूप खास होते.