Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नर्गिस दत्त आणि राज कपूर यांच्या गाण्यावर थिरकले सोनालिका, दयाबेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 13:14 IST

'तारक मेहता का उल्टा का चष्मा' मालिकेत गोकुळधाम वासियांनी लेझीमच्या तालावर बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोकुळधाममध्ये सांस्कृतिक ...

'तारक मेहता का उल्टा का चष्मा' मालिकेत गोकुळधाम वासियांनी लेझीमच्या तालावर बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोकुळधाममध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. याच कार्यक्रमात सोनालिका अर्थात माधवी भिडे आणि दिशा अर्थात दयाबेन दोघीही नर्गिस दत्त आणि राज कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यावर थिरकरणार आहेत. या दोघीही कळसूत्री बाहुल्यांचं नृत्य म्हणजे कठपूतली नृत्य करताना दिसतील. जहाँ मै जाती हूँ.... या गाण्यावर दोघीही थिरकणार आहे. या गाण्यावर नृत्य करणं आव्हानात्मक होतं अशी प्रतिक्रिया सोनालिका आणि दिशा यांनी दिलीय. हे नृत्य करताना मूळ गाण्यातील नृत्याचा कुठंही अपमान होऊ नये यासाठी वारंवार त्याचे व्हिडीओ पाहिल्याचं त्यांनी सांगितलंय. याचबरोबर डॉ. हाथी आणि अब्दुलभाई जोकर बनून रसिकांचं मनोरंजन करणार आहेत.