Join us

नाना पाटेकर देणार २४ला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 18:22 IST

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी परिंदा, वेलकम, वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची अनेक ...

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी परिंदा, वेलकम, वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत खूपच चांगली मैत्री आहे. नाना पाटेकर यांनी कधीही छोट्या पडद्यावर काम केले नाही. पण अनिलसाठी नाना छोट्या पडद्यावर काम करणार आहेत. २४ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाना पाटेकर यांचा छोट्या पडद्याशी संबंध येणार आहे. २४ या मालिकेत नाना अभिनय करत नसून या मालिकेसाठी ते आपला आवाज देणार आहे. नाना पाटेकर मालिकेच्या सुरुवातीला प्रेक्षकांना मालिकेच्या पात्रांविषयी माहिती देणार आहेत.