Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मध्ये रंगणार दीपा-कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 20:32 IST

'रंग माझा वेगळा' मालिका नव्या वळणावर आली आहे.

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेला अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. आता मालिका नव्या वळणावर आली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. प्रेक्षकांना दीपा-कार्तिकची केमिस्ट्री खूप भावली आहे. मात्र आता मालिकेत त्यांना जुळ्या मुली झाल्या आहेत आणि ते दोघे वेगळे झाले आहेत. एक मुलगी दीपाकडे आहे तर दुसरी मुलगी सौंदर्याकडे. आता ​मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेत दीपाने जुळ्या मुलींना जन्म दिला असला तरी दोन्ही मुली दोन वेगवेगळ्या घरात वाढत आहेत. कार्तिकने मुलींचे पितृत्व नाकारल्यामुळे दीपाने एकटीने मुलीला वाढवायचे ठरविले आहे. तर सौंदर्याने दीपाची एक मुलगी आपल्या घरी वाढवण्याचे ठरवले आहे. दोन्ही मुली जरी वेगवेगळ्या घरात वाढत असल्या तरी योगायोगाने दोघींचा बारसा मात्र एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी पार पडणार आहे.

देवावर श्रद्धा असणाऱ्या दीपाने आपल्या लेकीचा बारसा मंदिरात करायचा निर्णय घेतला आहे. तर सौंदर्या इनामदारनेही कोणताही बडेजाव न करता मंदिरातच बारसा करायचे ठरविले आहे. दोन्ही मुलींचे नावही ठरवण्यात आले आहे. दीपा आणि कार्तिकच्या नावावरुनच दीपिका आणि कार्तिकी असे मुलींचे नाव ठरवण्यात आले आहे.

आता या लेकी दुरावलेल्या दीपा-कार्तिकला पुन्हा एकत्र आणणार का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. ३० ऑगस्टच्या विशेष भागात हा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह