Join us

'इश्कबाज' अभिनेता नकुल मेहता होणार बाबा, पत्नीसोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज !

By गीतांजली | Updated: November 7, 2020 17:07 IST

लोकप्रिय टीव्ही अभिनेता नकुल मेहता लवकरच बाबा होणार आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता नकुल मेहता लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. नकुलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याचे आणि पत्नी जानकीचे सुंदर क्षण शेअर केले आहेत.  नकुलने पोस्ट शेअर करताच फॅन्ससोबक अनेक सेलेब्स त्याचे अभिनंदन करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना, नकुलाने लिहिले, बेस्ट फ्रेंड, मैत्रीण, मिसेस आणि आता हे. नकुलची पत्नी जानकीने बेबी बम्पसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले, आम्ही क्वारंटाईनमध्ये अजिबात बोर नाही झालो. 

नकुल मेहता आणि जानकीने 2012मध्ये लग्न केले. लग्नाच्या आधी ते एकमेकांना जवळपास 9 वर्षे डेट करत होते. जानकी एक गायक, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि स्टेज परफॉर्मर आहे.

नकुलाच्या  प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या करिअरची सुरुवात शाहरुख खानसोबत एका जाहिरातीतून केली होती.2008 मध्ये नकुलने अध्ययन सुमनच्या ‘हल ए दिल से’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात काही खास नव्हती आणि त्यानंतर त्याने टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरवात केली. २०१२ मध्ये त्याने 'प्यार का दर्द है' मालिकेतून त्यांने सुरुवात केली.  नंतर त्याने इश्कबाज आणि दिल बोले ओबेरॉय सारख्या बर्‍याच शोमध्ये काम केले आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन