Join us

​नागार्जुन-एक योद्धा मालिकेची टीम का कंटाळली करिश्माला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 16:50 IST

करिश्मा तन्नाची नुकतीच नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत एंट्री झाली आहे. करिश्माने याआधी क्योंकी सास भी कभी बहू थी या ...

करिश्मा तन्नाची नुकतीच नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत एंट्री झाली आहे. करिश्माने याआधी क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत तर बिग बॉस, झलक दिखला जा, नच बलिये या रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. या मालिकेत करिश्माची एंट्री होऊन काहीच दिवस झाले असले तरी तिने मालिकेच्या सेटवर सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे असे म्हटले जात आहे. करिश्माने चित्रीकरणाला सुरुवात करून केवळ 15-20 दिवस झाले आहेत. पण पटकथेत ढवळाढवळ करणे तसेच सेटवर नखरे करणे अशा गोष्टी ती करत असल्याने सगळे तिला कंटाळले असल्याचे म्हटले जात आहे. ती तिच्या संवादात, दृश्यात हस्तक्षेप करत असून तिच्या सांगण्याप्रमाणे त्यात बदल केले जावेत अशी तिची मागणी असते. तसेच ती मालिकेच्या चित्रीकरणासाठी खूपच कमी तारखा देते. ती तिच्या इतर कामांमध्ये व्यग्र असल्याने तिच्याकडे तारखाच नाही असे तिचे म्हणणे असते. चित्रीकरणाच्यावेळीदेखील ती वेळेवर सेटवर येत नाही. सगळेच कलाकार सकाळी नऊ वाजता सेटवर हजेरी लावतात. पण ती नेहमीच उशिराने येते आणि आल्यानंतर मेकअप करण्यासाठी जवळजवळ दोन तास घालवते अशीदेखील चर्चा आहे. पण तिची मालिकेत एंट्री होऊन काहीच दिवस झाल्यामुळे सध्या तिला कोणी काहीही बोलत नाहीये. पण करिश्मा असे काहीही वागत नाही असे या मालिकेचे निर्माते यश पटनाईक यांचे म्हणणे आहे. ते सांगतात, "करिश्मा आमच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीये. तसेच ती चित्रीकरणासाठी पुरेसा वेळ देते. त्यामुळे या अफवा कोण पसरवत आहेत हेच आम्हाला कळत नाहीये."