Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कोणी मुद्दाम असं का करेल?" मंदार देवस्थळींच्या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, म्हणाली- "तो खूप चांगला दिग्दर्शक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:29 IST

मराठी अभिनेता शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी निर्माते आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचे आरोप केले होते. आता मंदार देवस्थळींच्या मालिकेत काम केलेली अभिनेत्री नंदिता पाटकर हिने तिचा अनुभव सांगितला आहे. 

मराठी अभिनेता शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी निर्माते आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचे आरोप केले होते. वेळोवेळी पैसे मागूनही ५ लाखातील एकही रुपया न दिल्याचं म्हणत शशांकने मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं. शशांकला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला होता. तर काहींनी त्यांचे पैसे बुडाल्याचंही म्हटलं होतं. आता मंदार देवस्थळींच्या मालिकेत काम केलेली अभिनेत्री नंदिता पाटकर हिने तिचा अनुभव सांगितला आहे. 

नंदिताने 'इट्स मज्जाला' दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, "सुदैवाने माझ्या वाट्याला अजूनपर्यंत असा अनुभव आलेला नाही. मला माझ्या काही कामाचे पैसे उशीरा मिळाले पण मिळाले. कोणाची बाजू चूक किंवा कोणाची बरोबर हे नाही सांगता येणार...पण हे खरंच खूप त्रासदायक आहे. कारण शेवटी ती प्रत्येकाची रोजी रोटी आहे. मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना आधीच मालिका सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी कामाचे पैसे मिळतात. त्यामुळे काही प्लॅन्स असतात. मी मंदार देवस्थळींकडेही काम केलं आहे. पण माझा अनुभव चांगला होता. तेव्हा असे प्रॉब्लेम्स नव्हते. त्याचं प्रोडक्शन होतं. मी त्याच्या मालिकेत काम केलं होतं". 

"ती माझी पहिलीच मालिका होती. तसा मला मालिकेचा काहीच अनुभव नव्हता. जसे परेश मोकाशी माझे पहिले सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसा मालिकेचा पहिला दिग्दर्शक मंदार देवस्थळी. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कारण तो अत्यंत क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे. उठा आणि सीन करा असं तो करत नाही. तो प्रॉपर नाटकाच्या तालमीप्रमाणे रिहर्सल करतो. तसे इमोशन्स काढून घेतो. मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. तेव्हा त्याची परिस्थितीही चांगली होती. पण मुद्दाम कोणी असं करेल असं मला वाटत नाही. एखाद्याचा डाऊनफॉल असू शकतो. पण मला तरी त्याचा चांगला अनुभव आला", असंही पुढे तिने सांगितलं. नंदिता मंदार देवस्थळींच्या 'माझे पती सौभाग्यवती' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. या मालिकेत तिच्यासोबत वैभव मांगले याने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Why would anyone do that deliberately? Actress speaks on Mandar Devasthali.

Web Summary : Actress Nandita Patkar, who worked with Mandar Devasthali, shares a positive experience despite allegations of unpaid dues against him. She praises his creative directing style and doubts deliberate wrongdoing, citing potential financial downfall.
टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकार