Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिली प्लानिंग करतंय हे बिग बॉसचं कपल, लवकरच देणार गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 16:33 IST

बिग बॉसच्या नवव्या सीझनमधील हे कपल चर्चेत आले होते.

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या नवव्या सीझनमधील स्पर्धक रोशेल राव व कीथ सीक्वेरा चर्चेत आले आहेत. दोघांनी प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लग्न केलं होतं. आता या जोडप्यानं फॅमिली प्लानिंगबाबत चर्चा केली. हे जोडपे लवकरच गोड बातमी देऊ शकतो. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, कीथने सांगितलं की, रोशेल मुलासाठी एक्सायटेड आहे. तर रोशेल म्हणाली की, थोडे भीतीदायक आहे. जेव्हा या गोष्टीचा विचार करते तेव्हा माझ्या डोक्यात दोन गोष्टी येतात. मी विचार करते की चला ट्रॅव्हल करूयात किंवा आराम करू. पण, वास्तिवकमध्ये मला माहित आहे की गोष्ट लवकरच होणार आहे. आम्ही लवकरच कुटुंबाचा विस्तार करण्याची प्लानिंग करत आहोत.  

आधी कोणी प्रपोझ केला होता, असं विचारल्यावर रोशेलने सांगितलं की, आम्हाला ते क्षण चांगलेच लक्षात आहेत. लग्नासाठी कीथने व्हॅलेंटाईन डेला मला पहिले प्रपोझ केले होते. 

नच बलिए या डान्स रिएलिटी शोमधील स्पर्धेबद्दल कीथ व रोशेलनं सांगितलं की, तसं तर हे सांगणं म्हणजे घाई होईल. मात्र सोशल मीडियावर अनीता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. श्रद्धा आर्याचा देखील चाहता वर्ग मोठा आहे. अरे प्रिन्स व युविकालाही विसरता कामा नये. त्यांचेही चाहते खूप आहेत.

डान्सिंगबद्दल सांगायचं तर एली गोनी व नताशा स्टेनकोविक खूप चांगले डान्सर आहेत. शांतनु व फैजल फक्त चांगले नाहीत तर ब्रिलिएंट आहे. मधुरिमा तुली व विशाल आदित्य सिंग यांच्यासारखे नॉन डान्सरदेखील चांगले आहेत. या स्पर्धेकडे गांभीर्यानं पाहिले पाहिजे.

सूत्रांच्या माहितीनुसार नच बलिएमधून कीथ व रोशेल ही जोडी यावेळी एलिमिनेट होऊ शकते. हे कपल बिग बॉसमध्ये दिसले होते.

टॅग्स :नच बलियेबिग बॉस