Join us

विनीतला भावतात पौराणिक संवाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 17:45 IST

अभिनेता विनीत कक्कर आता संकटमोचक महाबली हनुमान या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत विनीत महाप्राश्व ही भूमिका साकारत ...

अभिनेता विनीत कक्कर आता संकटमोचक महाबली हनुमान या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत विनीत महाप्राश्व ही भूमिका साकारत आहे. एका पौराणिक मालिकेतील या भूमिकेमुळे विनीत सध्या खुश आहे. पौराणिक मालिकेत संवाद बोलणे मोठे आव्हानात्मक असते असे विनीतला वाटत आहे. त्यामुळे तो पौराणिक भाषेतील संवाद शिकत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी बरीच तयारी करावी लागते असेही विनीतने सांगितले. मालिकेच्या सेटवरील वातावरणही चांगले असून चांगल्या कलाकारांसह कामाची संधी मिळाली असल्याने चांगले वाटते असे विनीतने नमूद केले आहे.