Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चाहूल या मालिकेत निर्मलाचे उलगडणार रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:08 IST

चाहूल ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चाहुल या ...

चाहूल ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चाहुल या मालिकेत रशियातील अभिनेत्री लिसान प्रमुख भूमिका साकारत आहे. मराठी मालिकेत कोणत्याही परदेशी अभिनेत्रीने भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही रशियन अभिनेत्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत सर्जेराव या भूमिकेत आपल्याला अक्षर कोठारीला पाहायला मिळत आहे. अक्षरने कमला या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता तो चाहुल या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.सर्जेरावची बालपणाची मैत्रीण निर्मला आता कुठे आहे, काय करते हा प्रश्न त्याला गेल्या कित्येक दिवसापासून सतावत आहे. पण बबन्याला तिच्याविषयी काहीतरी माहीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याला जे सत्य माहीत आहे, ते सर्जेरावांपर्यंत पोहोचले की नाही याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. या सगळ्या गोष्टींची आता मालिकेत उकल होणार आहे. कारण स्वतः निर्मलाच परत येणार आहे. निर्मला भूत बनून परतणार आहे. त्यामुळे सर्जेराव आणि प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे लोकांना मिळणार का? निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार का? तिचा आत्मा अतृप्त असल्याने वाड्यात कोणा कोणाच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे? यामुळे जेनीवर काही संकट येणार आहे का? यांसारखी अनेक उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. या मालिकेत शाश्वती पिंपळकर, माधव अभ्यंकर, उमा गोखले, विजय मिश्रा, प्रज्ञा जाधव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.