Join us

ओवाळीते लाडक्या भाऊराया...! छोट्या भावासोबत मायराची पहिली भाऊबीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 12:48 IST

बालकलाकार मायराच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

भाऊबीज म्हणजे दिवाळीमधील एक महत्त्वाचा दिवस, कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी केली जाते.  बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस अशी 'भाऊबीजे'ची ओळख आहे. मराठी सेलिब्रिटींनीदेखील भाऊबीज साजरी केली. चिमुकली मायराच्या वायकुळ (Myra Vaikul) काही दिवसांपूर्वीच मोठी बहीण झाली आहे. तर यंदाची तिची लहान भावासोबतची पहिलीच भाऊबीज. 

बालकलाकार मायराच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) १५ सप्टेंबर रोजी गोंडस बाळाला जन्म दिला होता. आता मोठी ताई झाल्यानंतर मायरानं आपल्या लाडक्या भावासोबत भाऊबीज साजरी केली. याचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने 'माझी तुझी रेशीमगाठ'नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. 'कलर्स टीव्ही'वरील 'नीरजा: एक नयी पहचान' या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली.

टॅग्स :मायरा वैकुल