Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नव-याची बायको' फेम अभिनेता सचिन देशपांडेने केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:08 IST

कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक ...

कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.प्रार्थना बेहरे,सानिका अभ्यंकर,रोहन गुजर,सागरिका घाटगे,आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार रेशीमगाठीत अडकले आहेत.आता या यादीत आणखी एक मराठमोळ्या कलाकाराचं नाव सामील होत झाले आहे.अभिनेता सचिन देशपांडेनेही साखरपुडा केला आहे.सचिनच्या होणाऱ्या पत्नीचे नाव पियुषा बिद्नुर आहे.पियुषाचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही.खुद्द सचिनेच त्यांच्या साखरपुड्याची गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.दोघांचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.शेअर केलेल्या फोटोत दोघेही खूप आनंदित असल्याचेही पाहायला मिळत आहे.हेच फोटो त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसल्याची ग्वाही देत असल्याचे पाहयला मिळत आहे.दोघांची धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय.'माझ्या नव-याची बायको' मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंती उतरली.सध्या छोट्या पडद्यावर चांगलीच गाजते आहे.गुरुनाथ,राधिका आणि शनाया यांच्यावर आधारित ही मालिका रसिकांना चांगलीच भावते आहे.नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे. घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे.नुकतंच या मालिकेला छोट्या पडद्यावर दाखल होऊन एक वर्ष पूर्ण झालं.मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक रंजक भागांमुळे घराघरात मालिका लोकप्रिय ठरतात.सध्या छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. तुझ्यात जीव रंगला मालिकेला  या मालिकेला 'माझ्या नव-याची बायको' मालिकेकडून   जोरदार टक्कर पाहाला  मिळत आहे.कारण 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने टीआरपीमध्ये राणादा-अंजलीच्या मालिकेला मागे टाकले. माझ्या नवऱ्याची बायको टीआरीपमध्ये अव्वल स्थानी आहे.