Join us
Daily Top 2Weekly Top 5

Must See :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पत्रकार पोपटलालचे रिअल फॅमिली फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:16 IST

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा ...

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेचं नाव निघताच आपसुकच त्यातील प्रत्येक पात्र डोळ्यासमोर येतं. प्रत्येक पात्राची काही ना काही खासियत आहे. अशाच विविध व्यक्तीरेखांपैकी एक व्यक्तीरेखा म्हणजे पोपटलाल.हे नाव ऐकताच त्याचं लग्न कधी होणार असा प्रश्न तुमच्या डोक्यात लगेच घुमू लागेल.या मालिकेत पोपटलालची एंट्री झाल्यापासूनच माझे लग्न करून द्या असे तो त्याच्या गोकुळधाममधील मित्रमैत्रिणींना सांगत आहे. हा पत्रकार पोपटलाल कोणतीही चांगली मुलगी दिसली की तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहू लागतो. त्यावेळी आपल्यालादेखील आता पोपटलालचे लग्न होणारच असेच वाटते. पण दरवेळी त्याच्या लग्नात काहीतरी व्यत्यय येतो आणि त्याचे लग्न होत नाही. एकदा तर पोपटलाल लग्नाच्या मंडपापर्यंतदेखील पोहोचला होता. पण त्याहीवेळेस त्याचे लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार पोपटलाल मालिकेतून रसिकांचं मनोरंजन करतो आहे. मात्र आजवर पोपटलाल मालिकेत त्याची जोडीदार काही सापडली नाही. प्रत्येकवेळी कुणी ना कुणी त्याच्या आयुष्यात येते. तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं पोपटलाल रंगवू लागतो न लागतो तोच कुठेतरी माशी शिंकते आणि ती तरुणी पोपटलालच्या आयुष्यातून निघून जाते. मग काय पुन्हा एकदा पत्रकार पोपटलाल, त्याची छत्री आणि गोकुळधाम सोसायटीचे त्याचे सहका-यांसह आयुष्य तो जगू लागतो. नेहमी स्थळ शोधतेवेळी 'कॅन्सल कर दो' आणि 'दुनियाँ हिला दूँगा' म्हणत तो रसिकांचं मनोरंजन करतो. मात्र रिल पोपटलालचं रिअल लाइफ कसं आहे. त्याचे ख-या आयुष्यातही लग्न झालं आहे की नाही असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडलाच असेल. पत्रकार पोपटलाल याचं रिअल आयुष्यातलं नाव श्याम पाठक असं आहे. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या श्यामनं सीए व्हावं असं त्याच्या आईची इच्छा होती. रिल लाइफमध्ये मालिकेत तरुणी पत्रकार पोपटलाल याला नकार देत असल्या तरी श्याम पाठक प्रत्यक्ष जीवनात विवाहित आहे. 2003 साली श्याम पाठक विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या पत्नीचे नाव रश्मी असं आहे. नवी दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना श्यामची दाक्षिणात्य रश्मी हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला.पोपटलाल अर्थात श्याम पाठकला रिअल लाइफमध्ये सुंदर पत्नीसह 2 मुलंही आहेत. एक मुलगी आणि एका मुलाचा तो पिता आहे. त्याच्या लेकीचं नाव नियती असून लेकाचं नाव पार्थ असं आहे. पत्रकार पोपटलाल अर्थात श्याम पाठकनं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसह 'जसूबेन जयंतीलाल जोशी की जॉइंट फॅमिली', 'सुख बाय चान्स' या मालिकांमध्येही काम केले आहे.