Join us
Daily Top 2Weekly Top 5

Must See: डिंपीने सात महिन्यानंतर केले लाडक्या मुलीचे बारसे,नाव ठेवले रियाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 17:50 IST

'बिग बॉस' या रियालिटी शोची एक्स कंटेस्टंट आणि राहुल महाजनची पहिली पत्नी डिंपी गांगुलीनं आपल्या सात महिन्याच्या लेकीचं नाव ...

'बिग बॉस' या रियालिटी शोची एक्स कंटेस्टंट आणि राहुल महाजनची पहिली पत्नी डिंपी गांगुलीनं आपल्या सात महिन्याच्या लेकीचं नाव रियाना असं ठेवलंय. ट्विटरवरुन डिंपीने आपल्या लेकीच्या नावाची घोषणा केली आहे. बिग बॉस या रियालिटी शोचे एक्स कंटेस्टंट असलेल्या डिंपीने पहिला पती राहुल महाजनला काडीमोड देत दुसरं लग्न केलं. आपला बालपणीचा मित्र रोहित रॉय बरोबर लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या घरात एका गोंडस परीचं आगमन झालं. तब्बल सात महिन्यांनंतर डिंपीनं आपल्या लाडक्या लेकीचे नाव रियाना असे ठेवले आहे. ट्विटरवर डिंपीने लेकीचे फोटोही शेअर केलेत. शिवाय लाडक्या लेकीसह डिंपीने झक्कास फोटोशूटही केले आहे. सोशल मीडियावर याला डिंपीच्या फॅन्सकडून प्रतिसाद मिळतोय. फोटोमध्ये रियानाने बेबी पिंक आणि पांढ-या रंगाचा फ्रॉक घातला आहे, तर नेहमी  वेस्टर्न आऊफिटमध्ये दिसणा-या  डिंपीनेही मुलीच्या फ्रॉकला मॅचिंग पिंक कलरची नेसलेी आहे. तर डिंपचा पती रोहितनेही ट्रेडिशनल कुर्ता घातला आहे. 'स्वयंवर'  या संकल्पेनवर  आधारित  राहुल दुल्हनिया ले जायेगा या रिअॅलिटी शोमध्ये  राहुल महाजने डिंपी गांगुलीसह लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर या दोघांमध्ये आलबेल असल्याच्या बातम्या येवू लागल्या.अखेर काही दिवसांनतर तिने राहुलपासून घटस्फोट घेत. दुबईस्थित बिझनेसमन रोहित रॉयसोबत दुसरे लग्न केले. हा लग्नसोहळा कोलकात्यात  पार पडला होता. आता डिंपी रोहितसह संसारात रमली आहे. रियाना हे डिंपी आणि रोहितचे पहिले बाळ आहे.डिंपीने रियानाच्या जन्मानंतर तिच्या लाडलीची प्रत्येक अपडेट इन्स्टाग्रामवर अपडेट करताना दिसली. तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत ती खिडकीतून पावसाला बघत असल्याचा क्युट व्हिडीओत पोस्ट केला होता या व्हिडीओला फॅन्सकडून खूप सा-या कमेंटस मिळाल्या होत्या. रियाना आणि पती रोहितसह डिंपी मॅरीड खूप एंन्जॉय करतेय.नुकतेच मुलीच्या बारस्याच्या फोटोंना बघून नेटीझन्सकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय.