काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. या हल्ल्याचा कलाकार मंडळींनीही निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर अनेक जण काश्मीरला जाऊ नका, असे म्हणत आहेत. यावर अलिकडेच काश्मीरला गेलेली 'मुरांबा' फेम अभिनेत्री निशाणी बोरुले (Nishani Borule) हिने आपला अनुभव सांगत काश्मीरला जाऊ नका, असे म्हणणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेत्री निशाणी बोरुले हिने सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे आणि काश्मीरला जाऊ नका असे म्हणणाऱ्यांनाही फटकारले आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले की, काश्मीर किती सुंदर आहे, याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. लोक तिथे जाऊ नका असं म्हणत आहेत. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की, आपल्या सुरक्षिततेसाठी आपले सैन्य २४/७ काम करत असतात. आता जे घडलंय ते हृदयदावक आहे. पण काश्मीर न गेल्यामुळे त्याचा परिणाम तिथल्या स्थानिक लोकांवर होणार आहे. कारण त्यांचा उदरनिर्वाह पर्यटनावर चालतो. माझी सर्वांना विनंती आहे की, काश्मीरला जाऊ नका, असा मेसेज पसरविणे थांबवा. आपण असा मेसेज पसरवून तिथल्या प्रादेशिक अजेंडा यशस्वी होण्यासाठी मदत करतो आहे. तिने पुढे लिहिलंय की, फोटोतले ठिकाण सांगत म्हणाली की, ही तिच जागा आहे तिथे मी गेले होते. त्या ठिकाणाला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात.
निशाणी बोरुलेने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आणखी एक पोस्ट शेअर केलीय. त्यात म्हटलंय की, काश्मीरला जाऊ नका म्हणणं थांबवा आणि आता काश्मीरसोबत उभे राहण्याची गरज आहे.