Munmun Dutta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) घराघरात पोहोचली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मुनमुन दत्ता तिच्या करिअरमध्ये प्रोफेशनल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. ३८ वर्षीय ग्लॅमरस मुनमुन ही अजून सिंगल आहे. तिचे चाहते कायम तिला लग्न कधी करणार हे विचारताना दिसून येतात. अशातच आता अभिनेत्रीनं लग्नावर भाष्य केलंय.
मुनमुन दत्ताने नुकतीच रणबीर अलाहाबादियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला लग्न कधी करणार याबद्दल विचारण्यात आलं. मुनमुन म्हणाली, "मी लग्न करेन की नाही हे मला माहीत नाही. जर माझ्या नशिबात लग्नाचा योग असेल तर होईलच. पण, लग्नाच्या मागे धावणारी मुलगी मी नाही. माझा नवरा अमुक असा असावा किंवा माझे लग्न अशा एखाद्या मुलाशी व्हावे, हे माझे कधीच स्वप्न नव्हते".
तिला कशी मुले आवडतात, यावर मुनमुनने अतिशय स्पष्टपणे तिची पसंती सांगितली. ती म्हणाली, "मला ती मुलं आवडतात, जी चांगली दिसतात, ज्यांना उत्तम प्रकारे बोलता येते, जे समजदार असतील, ज्यांच्याकडे पैसे असतील, अशी मुले मला आवडतात. मी खोटे बोलणाऱ्यातील नाही, त्यामुळे एका मुलात हे सगळे गुण असले पाहिजेत असे मला वाटते. विदेशातील मुलांशी माझी चांगली बॉण्डिंग आहे. ते वेगळ्या ठिकाणी जन्मतात, वेगळ्या ठिकाणी राहतात, त्यांचे विचार प्रगल्भ होतात. अशी लोकं महिलांबरोबर प्रेमाने वागतात. जवळजवळ सगळ्याच महिला माझ्या या मताशी सहमत असतील".
Web Summary : Actress Munmun Dutta, known for 'Taarak Mehta,' addressed marriage plans in a recent interview. She stated that she isn't actively seeking marriage and has specific preferences for her ideal partner, including good looks, communication skills, understanding, and financial stability. She also expressed a preference for men with international exposure.
Web Summary : 'तारक मेहता' के लिए जानी जाने वाली अभिनेत्री मुनमुन दत्ता ने एक साक्षात्कार में शादी की योजनाओं पर बात की। उन्होंने कहा कि वह सक्रिय रूप से शादी की तलाश नहीं कर रही हैं और अपने आदर्श साथी के लिए उनकी कुछ प्राथमिकताएं हैं, जिसमें अच्छा दिखना, संवाद कौशल, समझदारी और वित्तीय स्थिरता शामिल है। उन्होंने अंतरराष्ट्रीय अनुभव वाले पुरुषों के लिए भी प्राथमिकता व्यक्त की।