BMC Election: आज राज्यात २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. नेते मंडळी, सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील सकाळी लवकर मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क बजावला.
प्राजक्ताने निळी शाई लावलेल्या बोटाचा फोटो पोस्ट करत मतदान केल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. त्याबरोबरच चाहत्यांनाही तिने पोस्टच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आवाहन केलं आहे. "मी मतदान केलं, आता तुमची वेळ आहे. मतदानाच्या अधिकाराला हलक्यात घेऊ नका. तुमचं एक मत निर्णायक ठरू शकतं. हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. तुमच्यापैकी किती जणांनी मतदान केलं? मला सांगा", असं कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिलं आहे.
प्राजक्ता माळी बरोबरच अक्षय कुमार, नाना पाटेकर, शशांक केतकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या महापालिकांचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. या २९ महानगरपालिकांसाठी जवळपास ७-८ वर्षांनी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्यात महत्त्वाची मानली जात असून इथे कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Web Summary : Actress Prajakta Mali voted in the municipal elections, urging others to vote. She emphasized the importance of each vote, comparing it to a war. Other celebrities like Akshay Kumar also voted. Results will be out on January 16th.
Web Summary : अभिनेत्री प्राजक्ता माली ने नगरपालिका चुनावों में मतदान किया और दूसरों से भी मतदान करने का आग्रह किया। उन्होंने प्रत्येक वोट के महत्व पर जोर दिया, इसकी तुलना युद्ध से की। अक्षय कुमार जैसे अन्य सेलेब्रिटीज ने भी मतदान किया। नतीजे 16 जनवरी को आएंगे।