९०च्या दशकातील 'शक्तिमान'ला लग्नाचे वेध लागले आहे. अभिनेता मुकेश खन्ना ६७व्या वर्षी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. वय म्हणजे फक्त आकडा आहे. मी माझं वय मोजतही नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत लग्न का केलं नाही, याचाही खुलासा या मुलाखतीत त्यांनी केला.
मुकेश खन्ना यांनी फिल्मी चर्चाला दिलेल्या मुलाखतीत लग्न, रिलेशनशिप यावर भाष्य केलं. "तुमचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला १० गर्लफ्रेंड असणं गरजेचं नाही. एका स्त्रीने पतिव्रता असलं पाहिजे, असं लोक म्हणतात. पण, पुरुषानेही पत्नीव्रता असलं पाहिजे असं कोणीही म्हणत नाही. पण, लोक पत्नीवर प्रेम करतो असं म्हणतात आणि तिला धोका देतात. लग्न केलं नाही म्हणजे लग्न संस्थेवर विश्वास नाही, असं नाही. पण, लग्न हे तुमच्या भाग्यात असावं लागतं. पत्नी अशीच भेटत नाही. ती आपल्या नशिबात लिहिलेली असते", असं त्यांनी म्हटलं.
पुढे मुकेश खन्ना म्हणतात, "पत्नी तुमच्या मागच्या जन्माचे कर्म सुधारण्यासाठी तुमच्या आयुष्यात येते. लग्न म्हणजे दोन आत्मांचं मिलन. अनेक नाती असू शकतात पण पत्नी एकच असते. प्रेम फक्त एकदाच होतं. बाकी मोह आणि वासना असते". लग्नाबद्दल विचारल्यावर मुकेश खन्ना म्हणाले, "जर माझं लग्न व्हायचं असतं तर झालं असतं. पण जी स्त्री माझ्या आयुष्यात येणार आहे, ती नक्कीच कुठे ना कुठेतरी असेल. जेव्हा आमचं भाग्य आमची भेट घालून देईल तेव्हा होईल. पण वय म्हणजे फक्त आकडा आहे. मी माझं वय मोजतही नाही".
Web Summary : Mukesh Khanna, famed Shaktimaan, may marry at 67. He believes age is just a number and marriage is destined, involving soulmates and past karma. He hasn't given up hope of finding his life partner.
Web Summary : शक्तिमान फेम मुकेश खन्ना 67 साल की उम्र में शादी कर सकते हैं। उनका मानना है कि उम्र सिर्फ एक नंबर है और विवाह भाग्य में लिखा होता है, जिसमें आत्माएं और पिछले कर्म शामिल होते हैं। उन्होंने अपनी जीवन साथी खोजने की उम्मीद नहीं छोड़ी है।