Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 07:15 IST

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली.

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. त्यातील सुमी आणि समरचं या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतात. सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला. २०० भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार त्यामुळे सेट वर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी २०१ व्या भागाचं काम चालू करायच्या आधी त्यांनी संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या २०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले. हा आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्या मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंकाच नाही. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :झी मराठी