Join us

मृणालचा बँजो लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 13:36 IST

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेतील मृणाल जैन रितेश देशमुखच्या बँजो या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. या चित्रपटातील रितेशचे काम तर ...

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेतील मृणाल जैन रितेश देशमुखच्या बँजो या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. या चित्रपटातील रितेशचे काम तर त्याला आवडले आहेच. पण त्याचसोबत या चित्रपटातील रितेशचा लुकही त्याला भावला आहे. नागार्जुन-एक योद्धा या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मिळालेल्या रिकाम्या वेळात त्याने रितेशसारखा लुक परिधान केला होता. तो सांगतो, "चित्रीकरणाच्या दरम्यान माझ्याकडे थोडासा रिकामा वेळ असल्याने मी हा प्रयोग करण्याचे ठरवले. खरे तर मला माझ्या लुक्ससोबत प्रयोग करायला खूपच आवडतात. मी रितेशप्रमाणे विग आणि अॅक्सेसरिजदेखील घातल्या. मला हा लुक आवडल्याने मी ही सगळी मेहनत घेतली. सगळेच सध्या माझ्या या लुकचे प्रचंड कौतुक करत आहेत. हा लुक माझ्या मालिकेसाठी नसून तो केवळ टाइमपास म्हणून मी केला होता असे मला माझ्या फॅन्सना सांगायचे आहे."