Join us

​‘मोगली’ भारतात येतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:59 IST

‘द जंगल बुक’ या चित्रपटातील ‘मोगली’ ची भूमिका साकारणारा बालकलाकार नील सेठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात ...

‘द जंगल बुक’ या चित्रपटातील ‘मोगली’ ची भूमिका साकारणारा बालकलाकार नील सेठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार आहे. भारतीय वंशाचा १२ वर्षीय नील त्याच्या पालकांसोबत अमेरिकेतील न्युयॉर्कला राहतो. त्याच्या या दौºया दरम्यान तो मुंबईतील काही खास जागांना भेट देणार आहे. नीलचे आजी आजोबा भारतात राहायचे. त्यांच्याकडून त्याने भारतातील जंगलांविषयी अनेक कथा ऐकल्या आहेत. त्याच्या मुळ गावी तो येण्यास उत्सुक आहे. तो मोगलीची भूमिका साकारतोय हे जेव्हा पालकांना समजले, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ८ एप्रिल रोजी ‘द जंगल बुक’ जगभरात प्रसिद्ध होईल.