Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत सेट हलवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 18:20 IST

कलश एक विश्वास या मालिकेच्या चित्रीकरणाची जागा रातोरात बदलण्यात आली आहे. या मालिकेचे चित्रीकरण ज्या स्टुडिओत सुरू होते, त्या ...

कलश एक विश्वास या मालिकेच्या चित्रीकरणाची जागा रातोरात बदलण्यात आली आहे. या मालिकेचे चित्रीकरण ज्या स्टुडिओत सुरू होते, त्या स्टुडिओचे छप्पर पडत असल्याचे प्रोडक्शन टीमच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी केवळ एकाच रात्रीत चित्रीकरणाची जागा बदलली. सध्या एका नव्या स्टुडिओत या मालिकेची टीम चित्रीकरण सुरू आहे. पण मालिकेच्या सगळ्या टीमची जुन्या स्टुडिओत चित्रीकरण करण्याची इच्छा आहे. गेली वर्षभर ते तिथे चित्रीकरण करत असल्याने त्या ठिकाणासोबत त्यांचे एक वेगळे नाते निर्माण झालेले आहे. जुन्या स्टुडिओत रिनोवेशनचे काम जोरात सुरू आहे, ते पूर्ण होताच तिथे पुन्हा चित्रीकरण केले जाणार आहे. मालिकेच्या टीमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचचले असल्याचे सांगण्यात आले. मी जुन्या स्टुडिओला खूप मिस करत असून पुन्हा तिथे चित्रीकरण करण्याची वाट पाहात असल्याचे या मालिकेत देविकाची भूमिका साकारणारी अपर्णा दिक्षित सांगते.