टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मौनीने पपती सूरज नांबियारसोबत घटस्फोट घेतला असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. या चर्चांवर मौनीने प्रतिक्रिया देताना 'आम्हाला प्रायव्हसी द्या' असं म्हटलं. मौनीचा चार वर्षांचा संसार मोडण्याच्या वाटेवर आहे. दरम्यान लग्नाआधी मौनीचं दोन अभिनेत्यांसोबतचं अफेअर खूप चर्चेत होतं. कोण आहेत ते?
मौनी रॉयचं नाव अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकासोबतही जोडलं गेलं होतं. त्यात अभिनेता मोहित रैना आणि अभिनेता गौरव चोप्रा या दोघांचं नाव आघाडीवर आहे. गौरव चोप्रा आणि मौनीने २००९ साली 'पती पत्नी और वो' मालिकेत काम केलं होतं. दोघं बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अगदी लग्न करणार इथपर्यंत त्यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणानं त्यांचं नातं तुटलं.
गौरवशी ब्रेकअपनंतर मौनीचं नाव 'देवो के देव महादेव' मालिका फेम अभिनेता मोहित रैनासोबत जोडलं गेलं. या मालिकेत मौनी पार्वतीच्या भूमिकेत होती. त्यांच्या जोडीची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. दोघंही अनेकदा एकमेकांसोबत दिसायचे. मात्र त्यांनी कधीच नात्यावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिली नाही.
मौनीचं नाव अभिनेता पुलकित सम्राटसोबतही जोडलं गेलं आहे. मात्र या चर्चांवर तिने स्पष्टीकरण देत दोघं चांगले मित्र असल्याचं सांगितलं होतं. मौनीने २०२२ साली बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली होती. गोवा मध्ये अतिशय ग्रँड पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. मौनीने लग्नाआधीपर्यंत तिचं सूरजसोबतचं नातं सीक्रेट ठेवलं होतं. लग्नानंतर त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल व्हायचे. मात्र आता त्यांच्या नात्यात मीठाचा खडा पडला असून दोघांनी आधीच घटस्फोट घेतल्याच्या चर्चा आहेत.
Web Summary : Amid divorce rumors with Suraj Nambiar, Mouni Roy's past relationships with actors Mohit Raina and Gaurav Chopra resurface. She was reportedly engaged to Chopra before marrying Nambiar.
Web Summary : सूरज नांबियार संग तलाक की अफवाहों के बीच, मौनी रॉय के मोहित रैना और गौरव चोपड़ा के साथ पुराने रिश्ते फिर सामने आए। बताया जाता है कि नांबियार से शादी करने से पहले उनकी चोपड़ा से सगाई हो गई थी।