मोनालिसाने स्वामी ओमला वगळून बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी ठेवले तिच्या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:28 IST
बिग बॉस सीजन-१० मध्ये सहभागी झालेली मोनालिसा ही तिच्या ‘पाकिस्तान में जय श्रीराम’ या कान्ट्रोर्व्हशियल भोजपुरी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ...
मोनालिसाने स्वामी ओमला वगळून बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी ठेवले तिच्या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग!
बिग बॉस सीजन-१० मध्ये सहभागी झालेली मोनालिसा ही तिच्या ‘पाकिस्तान में जय श्रीराम’ या कान्ट्रोर्व्हशियल भोजपुरी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग बिग बॉस-१० च्या सहकारी स्पर्धकांकरिता ठेवू इच्छिते. मात्र यासाठी ती स्वयंघोषित बाबा अन् बिग बॉस-१० मध्ये तिचा सहकारी असलेल्या स्वामी ओमला आमंत्रण देऊ इच्छित नाही. मोनालिसाने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मुंबईमध्ये रिलीज होणारा ‘पाकिस्तान में जय श्रीराम’ या चित्रपटाचा फर्स्ट शो ती बिग बॉस-१० मध्ये सहभागी झालेल्या तिच्या सहकारी स्पर्धकांसोबत बघणार आहे. परंतु या यादीत स्वामी ओमचे नाव नसेल असेही तिने स्पष्ट केले. याविषयी मोनाने एका इव्हेंटमध्ये सांगितले की, माझी अशी इच्छा आहे की, ‘पाकिस्तान में जय श्रीराम’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग बिग बॉस शोमध्ये माझ्यासोबत सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी ठेवण्यात यावे. यावेळी मोनाने हेदेखील स्पष्ट केले की, स्वामी ओमला सोडून मी सर्व स्पर्धकांना या स्क्रीनिंगसाठी बोलावू इच्छिते. मनवीर गुज्जर, मन्नू पंजाबी, लोकेश कुमारी यांच्यासोबत बसून मला हा चित्रपट बघायला आवडेल, असेही तिने सांगितले. मोनालिसाने चित्रपटाविषयी सांगितले की, हा चित्रपट माझा अत्यंत जवळचा प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती दबंग निर्माता भुपेंद्र विजय सिंगने बबलू एम. गुप्ता याच्या साथीने केले. हा चित्रपट बिहार आणि झारखंडमध्ये प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) रिलीज केला जाणार.