Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोना झाली इंटिमेट... पण कोणासोबत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 21:59 IST

बिग बॉसच्या घरात ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ हे जणू काही सूत्रच आहे. वॉर जरी कॉमन बाब असली तरी लव्हसुद्धा आता ...

बिग बॉसच्या घरात ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ हे जणू काही सूत्रच आहे. वॉर जरी कॉमन बाब असली तरी लव्हसुद्धा आता कॉमनच झाले आहे. कारण प्रत्येक सिजनमध्ये बिग बॉसच्या घरात एकतरी लव्हस्टोरी बहरते. यावेळेस भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आणि मनू पंजाबी यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे. मात्र गेल्या आठवड्यात मोनालिसाबद्दल वीजे बानी हिने केलेला खुलासा धक्कादायक आहे.खरं तर मोनालिसा आणि मनू एकमेकांसोबत फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. आतापर्यंत मोनालिसाने बºयाचदा मनूला किस आणि हग केले आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दोघांमध्ये काही घडत असल्याची चर्चा रंगत असेल तर हाही एक शोचाच भाग असतो. परंतु बानीने केलेला खुलासा प्रेक्षकांच्या भुवया उंचविणारा आहे. बानीच्या मते अंधाराचा फायदा घेऊन मोनालिसा इंटिमेट झाली होती. ४०व्या दिवशी गौरव चौपडा आणि राहुल देव यांच्याशी ती ही शॉकिंग बाब शेयर करीत होती. मात्र प्रेक्षकांना धक्का तेव्हा बसला जेव्हा मोनालिसाबरोबर इंटिमेट होताना मनू  नव्हे तर मनवीर असल्याचे ती म्हणाली. बानीने सांगितले की, घरातील लाइट्स बंद झाल्यानंतर मोनालिसा आणि मनवीर एकाच बेडवर झोपले होते. जेव्हा मी, वॉशरूममधून बेडकडे येत होती, तेव्हा मनवीर आणि मोनालिसा बेडवर विचित्र स्थितीत होते. मला बघितल्यानंतर मोनालिसा त्याच्याजवळच पडून राहिली. मात्र त्यांची इंटिमेसी सुरूच होती. हे बघून मला खूपच धक्का बसला. काही वेळानंतर मोनालिसा बाहेर निघून गेली.बानी हा सर्व किस्सा सांगत असताना राहुल देव याने तिला मध्येच थांबवित असे होऊच शकत नाही. कारण मोनालिसा मनवीरला भाऊ मानत असून, बºयाचदा तिने याचा उल्लेखही केल्याचे म्हटले. मात्र गौरवने बानीचे समर्थन करीत म्हटले की, मी तब्बल दीड दिवस त्यांच्यामध्ये राहिलो आहे. त्यांच्यात मला कुठेही भाऊ-बहिणीचे नाते दिसले नाही.  आतापर्यंत प्रेक्षकांनी मनू पंजाबी आणि मोनालिसाला रोमांस करताना बघितले. परंतु बानीने केलेले हे कन्फेशन प्रेक्षकांसाठी शॉकिंग होते. मात्र यामधील खरं काय हे बिग बॉसलाच माहीत असेल. जर बानीने सांगितलेला हा किस्सा खरा असेल तर मोनालिसावरून येत्या काळात मनू आणि मनवीरमध्ये बिनसण्याची शक्यता आहे.