Join us

मेहंदी सेरेमनीत दिसला मोना सिंगचा स्टनिंग अवतार, उद्या लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 10:46 IST

Mona Singh's Wedding : मेहंदी सेरेमनीचे फोटो...

ठळक मुद्देमोना सिंग लवकरच आमीर खान व करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार आहे. 

‘जस्सी जैसी कोई नहीं ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग उद्या 27 डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहे. होय, साऊथ इंडियन इन्व्हस्टमेंट बँकरसोबत मोना लग्नाच्या आणाभाका घेणार आहे. काल या लग्नाचे विधी सुरु झालेत. काल 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी मोनाची मेहंदी सेरेमनी झाली. या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये मोना पिंक कलरच्या सलवार सूटमध्ये अतिशय सुंदर दिसतेय.   फुलांचे दागिणे तिच्या सौंदर्याला ‘चार चांद’ लावत आहेत. दोन्ही हातावर मेहंदी सजली आहे आणि चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद आहे.

 

उद्या मुंबईत काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मोना लग्नबंधनात अडकणार आहे.  मोनाच्या होणा-या नव-याबद्दल सांगायचे झाल्यास  तो साऊथ इंडियन बँकर आहे आणि त्याचे नाव श्याम आहे.    मोनाला ‘जस्सी जैसी कोई नहीं’या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर  क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो व कवच खाली शक्तियों से या मालिकेत ती दिसली.

मोना सिंग लवकरच आमीर खान व करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार आहे. याशिवाय सध्या एकता कपूरच्या एका वेबसीरिजमध्येही ती काम करतेय. मोनाच्या  लग्नासाठी या वेबसीरिजच्या शूटींगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. लग्नासाठी शूटींग शिफ्ट बदलण्याची विनंती मोनाने केली होती. त्यानुसार, हे बदण्यात आले आणि मोनाने शूटींग पूर्ण केले.

टॅग्स :मोना सिंग