Join us

​मोना पुन्हा सूत्रसंचालनाकडे वळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 15:11 IST

मोना सिंगने एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. पण दरम्यानच्या काळात ...

मोना सिंगने एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. पण दरम्यानच्या काळात ती मालिकांमध्ये व्यग्र असल्याने तिला सूत्रसंचालन करता आले नव्हते. पण आता कॉमेडी नाईट्स बचाओ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ती सांभाळणार आहे. या कार्यक्रमाला नुकतेच एक वर्षं पूर्ण झाले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षात कार्यक्रमात अनेक बदल करण्यात येणार आहेत. कृष्णा अभिषेक, भारती सिंग यांच्यासोबत आता मोनाही या कार्यक्रमाचा प्रमुख भाग असणार आहे. या सूत्रसंचालनाविषयी मोना सांगते, "सूत्रसंचालन करताना मला खूप मजा येते. आपल्यातील हजरजबाबीपणाची त्यात कसोटी लागते. त्यामुळे मी पुन्हा एकदा सूत्रसंचालन करण्यासाठी खूप उत्सुक आहे."