Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्री लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये श्री विष्णुचा मोहिनी अवतार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:18 IST

कलर्स मराठीवर सुरु असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये सध्या प्रेक्षकांना समुद्रमंथन बघायला मिळत आहे. 

कलर्स मराठीवर सुरु असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मालिकेमध्ये सध्या प्रेक्षकांना समुद्रमंथन बघायला मिळत आहे. ज्या कारणासाठी हे समुद्रमंथन घडवून आणले ती घटिका आता जवळ आली आहे... नुकतेच श्री लक्ष्मीचे पहिले पाउल भूतलावर पडले आहे... आता समुद्र मंथनामधून लवकरच अमृत बाहेर येणार आहे... अमृताच्या प्राप्तीसाठी देव दानवांमध्ये युध्द झाले होते आणि ओढाताणीत इंद्राचा पुत्र जयंत अमृत कुंभ घेऊन पळून गेला. असुर आणि देवता यांच्यात बरेच वाद झाले. हे सारे बघून देवता अस्वस्थ झाले आणि त्यांनी श्री विष्णूचे आवाहन केले आणि देवतांच्या मदतीसाठी श्री विष्णूनी मोहिनीचा अवतार घेतला. श्री विष्णूनी मोहिनीच्या अवताराने सर्वांना मोहित करून टाकले आणि आता हेच रूप मालिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... भगवान श्री विष्णूनी मनुष्य रुपात जन्म घेतला आहे आणि प्रत्येकच रुपाला अवतार मानला जातो... आता बघुया पुढे काय होते ? 

टॅग्स :कलर्स मराठी