Join us  

'ये है मोहब्बते'फेम करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठी दोघांमध्ये रंगले कोल्ड वॉर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2017 1:34 PM

सध्या सोशल मीडियामुळे आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी एक उत्तम व्यासपिठ बनले आहे. आपला राग व्यक्त करण्यासाठी सध्या  'ये है ...

सध्या सोशल मीडियामुळे आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी एक उत्तम व्यासपिठ बनले आहे. आपला राग व्यक्त करण्यासाठी सध्या  'ये है मोहब्बते' या मालिकेतील इशीमा (दिव्यांका त्रिपाठी) रमन भल्ला (करण पटेल) सोशल मीडियाचा आधार घेतांना दिसतायेत.त्यामुळे या दोघांच्या मैत्रीत आता थोडा दुरावा आलेला दिसतोय.सोशलमीडियावर हे दोघे एकमेकांविरूध्द काही गोष्टी सतत अपडेट करत असल्यामुळे या दोघांमध्ये आता कोल्ड वॉर रंगल्याचे पाहायला मिळतेय.नुकतेच करन पटेलने ''माझ्या पाठीमागे बोलणे म्हणजेच माझे आयुष्य हे तुझ्या आयुष्यापेक्षा खूप इंटरेस्टींग आहे. जे काही बोलायचे आहे ते माझ्या समोर बोला,माझ्या विषयी इतरांना बोलणे म्हणजे तुमचे विचार किती छोटे आहेत हे दाखवण्यासारखे आहे''असे त्याने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.समझदारों को इशारा काफी होता है म्हणत त्याने  चक्क  दिव्यांकाला वॉर्निंग दिली असल्याचे बोलले जात आहे.करणच्या पोस्टनंतर लगेचच दिव्यांका त्रिपाठीनेही त्याला उत्तर देण्यासाठी एक फोटोसह स्ट्राँग कॅप्शन पोस्ट केली आहे. ''आधी तुमची भाषा सुधारा,जे काम करण्यासाठी तुम्ही इथे आहात ते योग्य पद्धीतीने करा,उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी करून तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.आयुष्य हे छोटं आहे, दरवेळी तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा सल्लाही दिव्यांका देताना दिसली.दोघांच्याही अशा पोस्ट सध्या सोशलमीडियावर एकमेकांना उत्तर देणा-या वाटत असल्यामुळे या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.मात्र एकमेकांवर राग काढण्या-या या पोस्ट करणने दिव्यांकासाठीच पोस्ट केल्या आहेत का? हे स्पष्ट झालेले नसून दोघेही कोणावर तरी सोशलमीडियाचा आधार घेत भडास काढण्याचा प्रयत्न करतायेत हे मात्र नक्की.