Join us

‘ये है मोहब्बते’मधून या कलाकाराची होणार एक्झिट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 13:17 IST

'ये है मोहब्बते' या रसिकांच्या लाडक्या शोमधून आणखी एका कलाकाराची एक्झिट होणार आहे.या मालिकेत निधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्र ...

'ये है मोहब्बते' या रसिकांच्या लाडक्या शोमधून आणखी एका कलाकाराची एक्झिट होणार आहे.या मालिकेत निधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्र पूनिया या मालिकेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.मालिकेत निधी हे पात्र सध्या जेलमध्ये असून ती बाहेर कधी येणार हे कुणालाही माहिती नाही.पवित्रनं मात्र या वृत्ताचा इन्कार केलाय.मालिका सोडण्याचा सध्या इरादा नसल्याचं तिनं म्हटलंय.निर्मात्यांना निधीला कधी समोर आणायचं हे माहित नाही, त्यांना वाटत असेल तर मी मालिकेत राहिल मात्र सध्या तरी निधीचं कमबॅक कधी होईल हे सांगू शकत नसल्याचं पवित्रनं म्हटलंय.