Join us

मीरा-समीरच्या नात्यात निर्माण होणार अविश्वासाची दरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:38 IST

cnxoldfiles/a> संकटात अडकलेल्या मीराला गरज आहे समीरच्या साथीची, मात्र गैरसमजामुळे समीरनेसुद्धा मीराची साथ देण्यास नकार दिला आहे. समीर-मीरामधील विश्वासाचं ...

cnxoldfiles/a> संकटात अडकलेल्या मीराला गरज आहे समीरच्या साथीची, मात्र गैरसमजामुळे समीरनेसुद्धा मीराची साथ देण्यास नकार दिला आहे. समीर-मीरामधील विश्वासाचं नातं दुभंगलं आहे.मौलिकच्या प्रकरणामुळे मीरा आणि समीरच्या नात्यात निर्माण झाली आहे अविश्वासाची दरी.आता ही दरी भरून काढण्यासाठी आजी मीराला एक संधी देऊ करणार आहे.मौलिकला शोधून काढण्याचं आव्हान आजी मीराला देणार आहे. या कामात मीराला मदत करण्याचे आजी समीरला सुचवणार आहे.मौलिकच्या शोधकार्याच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले मीरा-समीर पुन्हा एकत्र येतील, अशी आजीची आशा आहे आणि याचमुळे मौलिकचा शोध घेण्यासाठी दोघांना एकत्र येण्याचे आवाहन आजी करणार आहे. समीर आणि मीरामध्ये निर्माण झालेली ही अविश्वासाची दरी भरून येईल का? मीरा आणि समीरला एकत्र आणण्याची आजीची ही खेळी यशस्वी होईल का? मौलिकचा शोध लागेल का? मीरावर करण्यात आलेल्या आरोपांमधून तिची सुटका होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील,आगामी भागात उलडणार आहे का हे पाहणे रंजक ठरणार आहे.