Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिनी माथूरची सोशल मीडियावर उडविली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 20:24 IST

‘इंडियन आयडल’ या शोची होस्ट आणि दिग्दर्शक कबीर खान याची पत्नी मिनी माथूर हिने नोटबंदीवर दिलेली प्रतिक्रिया तिच्या चांगलीच ...

‘इंडियन आयडल’ या शोची होस्ट आणि दिग्दर्शक कबीर खान याची पत्नी मिनी माथूर हिने नोटबंदीवर दिलेली प्रतिक्रिया तिच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या घेतलेल्या निर्णयामुळे लोकांना होत असलेल्या त्रासावरून मिनी माथूरने सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. परंतु संतापलेल्या नेटिझन्सनी तिलाच उलट-सुलट सुनावत तिच्या प्रतिक्रियेची खिल्ली उडविली.  नोटबंदीमुळे लोकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर मिनीने ट्विट करून ‘प्रधानमंत्रीजी लोकांकडे खरेदीसाठी पैसेच उरलेले नाहीत, आता पुढे काय करायला हवे हे जरा सुचवाल का’ असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र मिनीचा हा प्रश्न लोकांच्या पचनी पडला नाही. त्यांनी तिला उलट-सुलट सुनावत तिची खिल्ली उडविली. लोकांचे संतापजनक रिट्विट वाचून मिनीला खूपच वाईट वाटले. मात्र तिने केलेले पलटवार हा अधिक मजेशीर होता. तिने ट्विट केले की, ‘चला चहा प्या, टोल भरा आणि कामाला लागा’