Join us

परवरिश २ घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:19 IST

परवरिश ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पण ...

परवरिश ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पण या दुसऱया सिझनला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या मालिकेचा टिआरपी सतत ढासळत असल्याने वाहिनीकडून ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेचा शेवटचा भाग १८ जुलैला दाखवण्यात येणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच संपले असून या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अनुज शर्मा, भाविका शर्मा आणि डायना खान यांनी फेअरवेल व्हिडिओ बनवून सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.