Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिना निमित्त कलाकारांचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:38 IST

‘झी टीव्ही’वरील ‘पिया अलबेला’मध्ये पूजाची भूमिका रंगविणारी शीन दास : प्रजासत्ताकदिनी कुटुंबियांबरोबर दिल्लीतील राजपथावरील परेड पाहणं हा मुख्य कार्यक्रम असतो. ...

‘झी टीव्ही’वरील ‘पिया अलबेला’मध्ये पूजाची भूमिका रंगविणारी शीन दास : प्रजासत्ताकदिनी कुटुंबियांबरोबर दिल्लीतील राजपथावरील परेड पाहणं हा मुख्य कार्यक्रम असतो. मला आठवतंय, मी शाळेत असताना आमचे  मुख्याध्यापक तिरंगा फडकवायचे आणि नंतर आम्हा मुलांना मिठाई वाटली जायची. माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा आणि सर्व भारतीयांनी हा दिवस साजरा करून या दिवसाचा मान राखावा, असं मी  आवाहन करते.‘झी टीव्ही’वरील ‘भूतू’मध्ये आरवची भूमिका रंगविणारा किन्शुक महाजन : सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ताँ हमारा- नेहमीच! माझ्या शाळेत तिरंगा फडकविल्यानंतर प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम सुरू होत असे. तेव्हा राष्ट्रभक्तीपर गीतांवर मी नृत्य करायचो. आम्ही सर्व मुलं तिरंग्याच्या रंगांचे कपडे घालून येत असू आणि आम्हाला हा दिवस फार आवडायचा. भारताला अभिमान वाटावा, असं काम करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा ! जय हिंद!‘झी टीव्ही’वरील ‘कुंडली भाग्य’मध्ये ऋषभ लुथ्राची भूमिका रंगविणारा मनित जौरा : प्रजासत्ताकदिनासारखे दिवस नेहमीच माझ्या मनात अभिमानाच्या भावना निर्माण करतात. आपण स्वतंत्र आहोत, आपले निर्णय आपणच घेऊ शकतो आणि आपण भारतीय आहोत, या गोष्टीच्या जाणीवेने माझं मन अभिमानाने उचंबळून येतं. मी दोन गोष्टींचं महत्त्व अतिशय आहे असं मानतो आणि त्यांना माझा नेहमीच पाठिंबा राहील. त्या गोष्टी म्हणजे मुलीचं शिक्षण आणि सुरक्षित प्रवास. गेल्या वर्षी मी सुरक्षित प्रवास मोहिमेत सहभागी झालो होतो आणि यंदाही मी ते काम करणार आहे. यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. ती भावना मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. शाळेत असताना अशा दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होणं ही फार मोठी गोष्ट वाटायची. पण आता इतक्या वर्षांनंतर मला या कार्यक्रमांचं खरं गांभीर्य आणि महत्त्व कळून येतंय. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला प्रजासत्ताक घोषित करणारी आपली राज्यघटना कशी अस्तित्त्वात आली आणि त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र  राष्ट्र बनलो. दुर्दैवाने आज बहुसंख्य लोकांसाठी हा एक सुटीचा दिवस बनला आहे. पण माझ्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून आपल्याला उभे करण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या  महान लोकांना आपण आज अभिवादन करू शकतो. आपल्याला आपल्या घरी सुरक्षितपणे राहाता यावं यासाठी आपल्या घरापासून दूर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाला मी आज अभिवादन करतो. पण त्यांचे आभार मानणं किंवा त्यांची आठवण काढणं हे पुरेसं नाही. ते लोक तिथे आहेत, म्हणूनच आम्ही इथे आहोत, याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. जय हिंद!