Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत रंगला समर-सुमीचा हळदी आणि मेहंदी सोहळा, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:40 IST

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत सध्या लगीनसराई सुरू झाली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद दिली आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांच्या मैत्रीनं सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लवकरच ते लग्नबेडीत अडकणार आहेत.

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत सध्या लगीनसराई सुरू झाली असून आता मालिकेत सुमी व समर यांच्या लग्नाच्या तयारीची लगबग पहायला मिळते आहे.

नुकताच त्यांचा हळदी व मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

 समर व सुमीने प्री वेडिंग फोटोशूटदेखील केलं होतं. या फोटोत त्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली वाटते आहे. 

आता त्यांचं लग्न २२ सप्टेंबर संध्याकाळी ७ पार पडणार आहे.  

झी मराठी वाहिनीवर 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकाद्वारे अमृता धोंगडे घराघरामध्ये पोहोचली आहे.

अमृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख मला 'मिथुन' या चित्रपटातून मिळाली. 

२०१७ साली झी युवावर आलेल्या 'जिंदगी नाॅट आऊट' या मालिकेतून तेजसला ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याने सचिनची भूमिका साकारली होती. त्याच्या या पहिल्याच भुमिकेचं सगळीकडून कौतुक झालं होतं.  

ही मालिका संपल्यानंतर तेजसला सध्या सुरु असलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतून प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे.

टॅग्स :झी मराठी