Join us

मेघा चक्रबोर्तीने अनुष्का आणि विराटला म्हटले पॉवर कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 15:57 IST

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचा जोडीचे अनेक फॅन्स आहेत. हल्लीच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती ऊर्फ ...

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचा जोडीचे अनेक फॅन्स आहेत. हल्लीच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती ऊर्फ स्टारप्लसवरील कृष्णा चली लंडनमधील कृष्णाने या जोडप्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला अनुष्का आणि विराट हे अतिशय आवडतात कारण ते एक पॉवर कपल आहेत. मी त्यांच्या नेहमीच प्रेम पाहिले आहे. अनुष्का विराटच्या प्रत्येक सामन्याच्या वेळेस त्याला अगदी उत्साहाने चीअर करत असते आणि तोसुद्धा मैदानातून तिच्या प्रेमाला प्रतिसाद देत असतो. ते दोघे नेहमीच एकमेकांना समर्थन देतात आणि त्यामुळे त्यांना दोघांना ऑनस्क्रीन एकत्र पाहताना मला खूप छान वाटतं.” कृष्णा चली लंडनमध्ये मेघा एका महत्त्वाकांक्षी आणि खंबीर मनाच्या मुलीची भूमिका साकारत असून तिला डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि आपल्या खूप प्रेम करणारा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला साथ देणारा विराट कोहलीसारखा पती आपल्याला मिळावा असे तिला वाटते… आणि मग तिचे लग्न होते राधेसोबत, जो एक गोड दिसणारा मुलगा असून तो जणू अख्खे जग तिच्या पायाशी आणून ठेवतो आणि तो अगदी क्रिकेटपटू विराटसारखास आहे.मेघा ही कोलकात्यातच लहानाची मोठी झाल्याने तिला बंगालीपेक्षा अन्य कोणत्याही भाषेत बोलणे अवघड जात असे.आता ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत ती उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये राहणारी तरुणी असल्याने तिला तेथील स्थानिक भाषा आणि तिचे उच्चार येणे भाग होते.तेव्हा मेघाने ती भाषा शिकण्यासाठी चक्क एका हिंदी भाषेची शिकवणी सुरू केली होती.त्यानंतर ती उत्तम हिंदीतून संवाद साधते.या मालिकेने तिला तिच्या करिअरमध्ये पुढचा टप्पा गाठण्यासाठी खूप चांगले अनुभव दिल्यामुळे ती निर्मांत्यांचेही खूप आभारी असल्याचे तिने म्हटले आहे.