Join us

'मेरी हानिकारक बीवी'विनोदी मालिकेतू करण सुचक आणि जिया शंकर रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 14:33 IST

टीव्हीच्या खजिन्यातुन आता अजुन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.जिचं नाव आहे 'मेरी हानिकारक बीवी' आपल्‍या काल्‍पनिक मालिकांमध्‍ये अधिक ड्रामा ...

टीव्हीच्या खजिन्यातुन आता अजुन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.जिचं नाव आहे 'मेरी हानिकारक बीवी' आपल्‍या काल्‍पनिक मालिकांमध्‍ये अधिक ड्रामा व कॉमेडीची भर टाकणारी एक 'मेरी हानिकारक बीवी' विनोदी मालिका आहे. ही मालिका नसबंदीच्‍या समस्‍यांवरील विनोदांसह प्रेक्षकांना रोलरकास्‍टरवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे. मालिकेची कथा वाराणसीमधील एक साधा मुलगा अखिलेश आणि मुंबईमधील एक डॉक्‍टर ईरा यांच्‍या अवतीभोवती फिरेल. भारतात टेलिव्हिजनवर पहिल्‍यांदाच प्रेक्षकांसमोर नसबंदीची समस्‍या मालिकेतून अगदी हलक्‍या पद्धतीने मांडली जाणार आहे. करण सुचक हा अखिलेश पांडेची भूमिका साकारणार आहे, तर जिया शंकर ही डॉक्‍टर ईराची भूमिका साकारणार आहे. आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना करण सुचक म्‍हणाला,मेरी हानिकारक बीवी या मालिकेसह मी माझ्या शैलीपेक्षा नव्‍या शैलीचा प्रयोग करत आहे. मी यापूर्वी पौराणिक व ऐतिहासिक मालिकांमध्‍ये काम केले आहे. मला अशा साहसी व अनोखी संकल्‍पना असलेल्‍या मालिकेचा भाग बनल्‍याने खूप आनंद झाला आहे. सध्‍या मी, माझी भूमिका अखिलेशच्‍या बारीक-सारीक गोष्‍टी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. माझी भूमिका वाराणसीमधील एका साध्‍या, निरागस व प्रामाणिक मुलाची आहे. तो निस्सिम भक्‍त आहे आणि तो त्‍याच्‍या आई-वडिलांचा खूप आदर करतो. त्‍यांचे शब्‍द हे त्‍याच्‍यासाठी आदेशाप्रमाणे आहेत. अखिलेशची शरीरयष्‍टी शक्तिशाली असली तरी तो लाजाळू व भित्रा आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही संकल्‍पना आवडेल.आपल्‍या भूमिकेबाबत बोलताना जिया शंकर म्‍हणाली,मेरी हानिकारक बीवी या मालिकेची संकल्‍पना खूपच रोमांचक आहे. ही संकल्‍पना यापूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर कधीच दिसण्‍यात न आलेल्‍या या मालिकेमध्‍ये कॉमेडी व ड्रामा आहे. तसेच नसबंदी या प्रमुख विषयावर फोकस करण्‍यात आले आहे. मी डॉ. ईराच्‍या भूमिकेत दिसणार आहे. ईरा ही कडक, व्‍याव‍हारिक, हुशार आहे, पण तितकीच दयाळू देखील आहे. मी या भूमिकेमध्‍ये सामावून जात ही भूमिका साकारण्‍यास सज्‍ज आहे. मी या नवीन प्रवासासाठी खूपच उत्‍सुक आहे. आशा करते की प्रेक्षकांना माझी ही भूमिका आवडेल.