Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राणी मी होणार' मालिकेत लगीनघाई, मीरा होणार मल्हारची राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 18:08 IST

'राणी मी होणार' मालिकेत लवकरच मीरा आणि मल्हारच्या लग्नाची लगबग सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

 'राणी मी होणार' मालिकेत लवकरच मीरा आणि मल्हारच्या लग्नाची लगबग सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. आपल्या आयुष्याचा जोडीदार श्रीमंत असावा या विचारांच्या मीराला मल्हारच्या तिच्यावरील प्रेमाची साधी कल्पना देखील नाही आहे. मैत्रीपलीकडे झुकेलेलं हे सुंदर नातं आता एका अशा बंधनात अडकणार आहे ज्याचा दोर अगदी त्यांच्या घट्ट मैत्रीइतकाच मजबूत असणार आहे. 

मीरा आणि मल्हारची लगीनगाठ बांधली जाणार आहे. मल्हारला तर त्याची राणी भेटलीये पण मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?, मल्हार मीराला आपल्या प्रेमाची कबुली कशी देईल?, एक हक्काचा मित्र की आयुष्यभराचा जोडीदार यापैकी कुठल्या नात्यात मीरा मल्हारला स्विकारेल? की हा हक्काचा मित्रच आयुष्यभराचा जिवलग जोडीदार होईल?, लग्नानंतर या दोघांच्या घट्ट मैत्रीचं रूपांतर अतूट प्रेमात होईल का? हे आणि असे असंख्य प्रश्न सध्या तुम्हा-आम्हाला पडत आहेत आणि त्याची उत्तरं मात्र 'राणी मी होणार' या मालिकेच्या पुढच्या भागांत आपल्याला पाहायला मिळणार आहेत तेव्हा सोनी मराठी पाहणं विसरायचं नाही.

सुखी संसाराचं चित्र रेखाटण्यासाठी श्रीमंती फक्त आणि फक्त निर्व्याज प्रेमाची हवी हे सांगणारी सोनी मराठीवरील 'राणी मी होणार' ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. पैसा आणि स्टेट्स यांच्या मायाजाळात अडकलेल्या पिढीला एक चांगला संदेश या मालिकेद्वारे देत असून लवकरच मीरा आणि मल्हारच्या एकमेकांवरील प्रेमाने ते सिद्ध देखील करून दाखवणार आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे.