मोठ्या पडद्यावर रसिकांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केल्यानंतर शाहिद कपूर आता छोट्या पडद्यावर एंट्री करतोय. डांसिंग रिअॅलिटी शो ‘नच बलिए 9’ सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सीजनला शाहिद कपूर एकटाच जज करणार नाही तर त्याला साथ देणार आहे त्याची पत्नी मीरा राजपूत. पहिल्यांदाच शाहिद पत्नी मीरासह झळकणार असून मीराची ग्लॅमर इंडस्ट्रीत एंट्री करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
'नच बलिये'च्या माध्यमातून मीरा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पत्नी मीराची साथ लाभणार म्हटल्यावर हा शो शाहिदसह रसिकांसाठीही थोडा खास असणार आहे. तुर्तास या सीजनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी होणार याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीत. लवकरच स्पर्धकांची यादी जाहिर करण्यात येणार असल्याचे समजतंय.
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती.
यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय.