Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नव-याची बायको’मधील ‘रेवती’, ख-या आयुष्यात आहे 'या' अभिनेत्याची पत्नी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 15:54 IST

गुरुनाथ विरोधातील लढाईत राधिकाला रेवतीची खंबीर साथ लाभते. या मालिकेत रेवतीला पुरुष, पुरुषी वृत्तीबद्दल प्रचंड राग दाखवण्यात आला होता.

'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली. या मालिकेत राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रीण म्हणजे रेवती. गुरुनाथ विरोधातील लढाईत राधिकाला रेवतीची खंबीर साथ लाभते. या मालिकेत रेवतीला पुरुष, पुरुषी वृत्तीबद्दल प्रचंड राग दाखवण्यात आला होता. रेवतीची हीच भूमिका अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारली होती. 

श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते. या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. पती राहुल, मुलासह श्वेता धम्माल करत असते. नातेवाईक आणि मित्रांसहसुद्धा ती फुल्ल ऑन एन्जॉय करते. 

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे. 'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोश्वेता मेहंदळे