Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत आजोबा करणार परीचा स्वीकार, पार पडणार नेहा- यशचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:20 IST

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतयश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

झी मराठी वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. हि मालिका अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत आता लवकरच यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. त्यांचा साखरपुडा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत गेल्या काही काळापासून एक वेगळाच ट्विस्ट पहायला मिळतोय. परी नेहाची मुलगी आहे पण हे यशाच्या आजोबाना माहित नाही. त्यांना वाटतंय नेहाचे शेजारी बंडू काका यांची परी नात आहे. तसेच यश आणि नेहाचं लग्न झालं आहे असेही आजोबाना वाटत आहे. आजोबांची प्रकृती खराब असल्याचे निमित्त साधून यशची काकी सिम्मीने हा सगळा व्याप वाढवून ठेवला आहे. त्यात आता परीच घरात असणं आजोबांसाठी उल्हासदायी ठरतंय. इतकच काय तर तिच्या असण्याने घरातील बरीच नाती सुधारताना दिसत आहेत.

हे पाहून आजोबानी परीला दत्तक घेण्याचे योजिले आहे. विश्वजित आणि मिथिलाच्या ऍनीव्हर्सीनिमित्त परीला त्यांच्यासाठी आपण दत्तक घेत आहोत अशी आजोबा घोषणा करतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. पण यश परीचे नेहासोबतचे आणि साहजिकच त्याच्यासोबत असलेले नाते आजोबांना सांगतो. काही वेळासाठी सगळं काही संपत का काय..? अशी भावना सर्वांच्याच मनात येते. पण सुज्ञ विचारांनी आजोबा या नात्याचा स्वीकार करतात आणि पणती म्हणून परीचाही. यानंतर यश आणि नेहाचा साखरपुडा करण्याचे योजिले जाते आणि येत्या काही भागांमध्ये त्यांचा साखरपुडा देखील होणार आहे. 

टॅग्स :झी मराठी