Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझी तुझी रेशीमगाठ' रंजक वळणावर, अखेर यश आजोबांना सांगणार नेहा परीची आई असल्याचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:27 IST

Mazi Tuzi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. तसेच या मालिकेतील छोट्या परीने आपल्या गोड स्वभावाने सर्वांना आपलेसे केले आहे. एकीकडे मालिकेत यश आणि नेहा आजोबांना सर्व खरे सांगण्यासाठी धडपडत आहे. तर दुसरीकडे सिम्मीचे कारस्थान काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान आता मालिका रंजक वळणावर आली आहे. अखेर यश आजोबांना परीचं सत्य सांगणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, नेहा लंडनवरून परत आली आहे. तिथून आणलेले गिफ्ट ती सर्वांना देते. त्यादरम्यान परी मिथिला आणि विश्वजीत यांना मोठी आई आणि मोठे बाबा बोलू का असे विचारते. ते दोघे खूश होतात. त्यानंतर सिम्मी आजोबांच्या मनात जाणून बुजून परी मिथिला आणि विश्वजीतच्या आयुष्यात आली तर त्यांचा संसार सुरळीत होईल असे सांगते. आजोबांनाही ते योग्य वाटते. कारण परी पॅलेसमध्ये आल्यानंतर विश्वजीतमध्ये झालेला बदल दिसून येतो. त्यामुळे आजोबा मिथिला आणि विश्वजीत यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी परीला दत्तक घेतोय, असे सांगण्याचे ठरवतात.

नुकताच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, कृपया सर्वांनी ऐका. चौधरींच्या या पॅलेसमध्ये सणासमारंभांनी मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला आहे.  परीला मी दत्तक घ्यायचे असे ठरवले आहे. हे ऐकून नेहा कोलमडून जाते. त्यानंतर यश आजोबांना म्हणतो की, आजोबा, तुम्ही म्हणताय ते शक्य नाही. कारण परीचे आई वडील जिवंत आहेत. नेहा परीची खरी आई आहे. आता आजोबांना परीचं सत्य समजल्यावर ते काय निर्णय घेणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :झी मराठी