Join us

'मी कधी एकटी नव्हतेच...', 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील सिम्मीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:27 IST

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ(Mazi Tuzi Reshimgath)नं अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली आहे. मात्र आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून देताना दिसत आहेत. दरम्यान आता मालिकेत सिम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीतल क्षिरसागर (Shital Kshirsagar) हिने व्हिडीओ शेअर करत या मालिकेच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.

शीतल क्षिरसागर हिने इंस्टाग्रामवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, सिम्मीच्या प्रवासातला हा शेवटचा शॉट.. आमची मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' आता लवकरच तुमचा निरोप घेईल. अनोखी वळणं घेत एका सुंदर टप्प्यावर ह्या गुंतागुंतीच्या भुमिकेचा निरोप घेताना संमिश्र भावनांची आंदोलनं गेली काही दिवस अनुभवत होते. पण काल सिम्मीला निरोप देताना "चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनो"हे साहीर लुधयानवी चे शब्द मनात रुंजी घालत होते.

तिने पुढे म्हटले की, सिम्मीच्या प्रवासात मी कधी एकटी नव्हतेच..माझी संपूर्ण टीम आणि तुम्ही सगळे बरोबर होतात. आशीर्वाद , मार्गदर्शन,आनंद, कौतुक, शाबासकी ,अपमान, अश्रू,कठोर मेहनत आणि टीका ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे सिम्मी. मला ती शोधण्यासाठी आणि सापडण्यासाठी सगळ्यांची मदत झाली. सगळयांची आभारी आहे. माझी तुझी रेशीमगाठ आणि सिम्मी चा हा प्रवास लवकरच थांबेल. पण नवीन प्रवास.. नवीन भूमिका... नव्याने शिकणं... आपली रेशीमगाठ.. कायम राहील. बाप्पा मोरया 
टॅग्स :झी मराठी