Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधली नेहा फेम प्रार्थना बेहरे कंटाळली सेटवरील दररोजच्या या गोष्टीला, वाचून म्हणाल अरेच्चा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:35 IST

Mazi Tuzi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहाचा लग्नानंतरचा लूक बदलला आहे. तिचा हा लूक प्रेक्षकांना खूप भावला आहे.

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. यशची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि नेहाची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने साकारली आहे. मालिकेत नेहा कामतचे यश चौधरीसोबत नुकतेच लग्ना पार पडले. त्यामुळे लग्नानंतर नेहाचा लूकदेखील बदलला आहे. नेहा कामत पंजाबी ड्रेस परिधान करत होती. मात्र आता लग्नानंतर नेहा साडीत पाहायला मिळते आहे. दरम्यान आता नेहाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सेटवरील एका गोष्टीची तक्रार केली आहे. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला मालिकेत लग्न झाल्यानंतर आता रोजच्या रोज साड्या घालावे लागत आहेत आणि ती या गोष्टीला खूप कंटाळली आहे. याबाबत ती म्हणाली की, किती वैताग आहे, दररोज साडी घालायची आणि नंतर ऑफिसला पण जायचं. ते मला सुट्टी पण देत नाहीत. त्यामुळे मला खूपच कंटाळा आला. ही स्नेहा मला रोज साड्या देते.

मालिकेत नेहा व यशचं नुकतंच लग्न झालं. दोघांचा संसार आनंदाने न्हाऊन निघाला असताना सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला पती कटकारस्थान करताना दिसून येत आहेत. या सर्व संकटातून वाट काढत यश व नेहा पुढे जात आहेत आणि त्यांना मिथिला आणि विश्वजीत काका-काकूंची मदत मिळत आहे. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे