Join us

माझी तुझी रेशीमगाठमध्ये परी होणार ताई, चौधरींच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:15 IST

चौधरींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असतानाच आता मालिकेत एक मोठं रंजक वळण आलं आहे. चौधरी कुटुंबात नेहा आणि परीचा समावेश झाल्यानंतर पॅलेसचं रुप अगदी पालटून गेलं होतं. पहिल्यांदाच त्यांचं कुटुंब एकत्र कुटुंबाप्रमाणे राहू लागलं होतं. दुसरीकडे विश्वजीत आणि मिथीला यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. परीची काळजी मिथिला आणि विश्वजीत घेताना दिसत आहेत. परी आणि पिकूचूने मिळून घराचं गोकुळ केलं आहे. आता परी ताई होणार आहे. चौधरींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. याच चौधरींच्या घरी नेहा नाहीत तर मिथिला गुडन्यूज देताना दिसणार आहे. मिथिला विश्वजीतला भिती वाटत असल्याचं सांगते. तेव्हा विश्वजीत तिला 'या वयात बाळासाठी चान्स घेणारे आपण पहिलेच कपल नसल्याचे सांगताना दिसतोय. मिथिला त्याला काल नेहाशी याबाबत बोलली असल्याचं सांगते. तिच्याशी बोलून मला फार छान वाटलं. तिच्यामुळे मला फार सकारात्मक वाटत असल्याचं सांगते.

मिथिला आणि विश्वजीत यांचे बाळासाठीचे प्रयत्न अखेर फळाला येणार असून मालिकेच्या येत्या भागात मिथिला ती आई होणार असल्याची गुड न्यूज सगळ्यांना सांगणार आहे. याचाच अर्थ आता परीबरोबर खेळण्यासाठी एक नवा फ्रेंड तिला भेटणार आहे. यावर आजोबांचा आणि घरातील इतर सदस्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल.  

 

टॅग्स :झी मराठी