Join us

​लव्ह लग्न लोचामध्ये मयुरी वाघची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:42 IST

अस्मिता या मालिकेमुळे मयुरी वाघ लोकांच्या घराघरात पोहोचली. तिने साकारलेली अस्मिताची भूमिका चांगलीच गाजली होती. दरम्यानच्या काळात तिने अभिनेता ...

अस्मिता या मालिकेमुळे मयुरी वाघ लोकांच्या घराघरात पोहोचली. तिने साकारलेली अस्मिताची भूमिका चांगलीच गाजली होती. दरम्यानच्या काळात तिने अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केले. लग्नानंतर काही दिवस ती छोट्या पडद्यापासून दूर होती. पण आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर परतली आहे. झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमध्ये सध्या बरीच धमाल सुरू आहे. आकांशा आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा घोळ आणि विनय आणि गॅंगने केलेली धमाल, अभिमान आणि शाल्मलीच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाची चाहूल, राघव आणि काव्याचे प्रेमप्रकरण या सर्वांमुळे ही मालिका आणखीनच रंगतदार बनली आहे. सुमित आणि सौम्याच्या एक्झिटनंतर त्यांच्या जागी आता कोणी येणार की नाही याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेच्या फॅन्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. या मालिकेत एका नवीन पात्राची एंट्री होणार असून ऋतू हे या नवीन पात्राचे नाव आहे. ही भूमिका अभिनेत्री मयुरी वाघ साकारणार आहे.ऋतू ही अतिशय स्मार्ट आणि अतिशय मॉडर्न मुलगी आहे. तिच्या स्वभावामुळे ती काहीच दिवसांत सर्वांची लाडकी सुद्धा बनणार आहे. तिच्यासाठी तिचे करिअर सगळ्यात महत्वाचे असून तिला लग्न करण्याची इच्छा नाहीये. सध्या लव्ह लग्न लोचामध्ये काव्या हे सगळ्यात बिनधास्त कॅरेक्टर आहे. पण ऋतू ही तिच्यापेक्षा जास्त बिनधास्त असणार आहे. ऋतू ही लेखिका असून ती वृत्तपत्र आणि मासिकांसाठी प्रेम, नातेसंबंध या विषयांवर लेख लिहित असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेम, नातेसंबंध यावर ऋतू लिहित असली तरी यामधील कोणत्याही प्रकारची भावना आजपर्यंत तिने अनुभवलेली नाहीये. तिच्या एन्ट्रीनंतर मालिकेत अजून धमाल येणार यात काही शंकाच नाही.Also Read : लव्ह लग्न लोचा फेम सिद्धी कारखानीसचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?