Join us

​मे आय कम इन मॅडम या मालिकेत साजन आणि संजनाचे होणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 10:09 IST

मे आय कम इन मॅडम या मालिकेत साजनला त्याची बॉस संजना आवडते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत साजनला त्याची बॉस संजना आवडते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची त्याची इच्छा आहे. पण साजनचे काश्मिरासोबत लग्न झाले असल्याने त्याने त्याची ही इच्छा तो नेहमीच सगळ्यांपासून लपवून ठेवतो. पण आता मालिकेत झालेल्या एका चाचाजींच्या रिएंट्रीमुळे त्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे.या मालिकेत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना चाचाजी म्हणजेच सतिश कौशिक पाहायला मिळाले होते. त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण सतिश कौशिक या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याने त्यांनी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण त्यांना परत आणण्यासाठी अनेकांनी निर्मात्यांना आणि लाइफ ओके वाहिनीला पत्र लिहिली होती. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीचा मान राखून सतिश कौशिक यांची आता या मालिकेत रिएंट्री होणार आहे. त्यांच्या एंट्रीनंतर मालिकेत अनेक नाट्यमय वळणे येणार आहेत. साजनचे संजनावर प्रेम असल्याने त्याने काश्मिराला घटस्फोट देऊन संजनासोबत लग्न करावे असे चाचाजी त्याला सुचवणार आहेत. संजनासोबत लग्न करण्याचे साजनचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. चाचाजींमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे आता त्यालादेखील वाटायला लागले आहे. चाचाजी आता काश्मिराला साजनला घटस्फोट देण्यासाठी तयार करणार आहेत तर दुसरीकडे संजनाशी साजनसोबत लग्नाबाबत ते बोलणार आहेत. याविषयी या मालिकेत साजनची भूमिका साकारणारा संदीप आनंद सांगतो, "साजनसाठी त्याचे स्वप्न खरे झाल्यासारखेच आहे. पण दुसरीकडे साजनचे त्याची पत्नी काश्मिरावरदेखील तितकेच प्रेम आहे. त्यामुळे ही गोष्टी चाचजींना समजावून कशी सांगायची हा प्रश्न त्याला पडलेला आहे. या सगळ्यात आता काय होते हे प्रेक्षकांना पुढील भागांमध्येच पाहायला मिळेल."