Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे..! 'ठरलं तर मग' मालिकेतील 'या' अभिनेत्याने बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:49 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. दरम्यान आता ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेत्याने लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम विवाहबंधनात अडकले. फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेता आकाश पाटीलचेही नुकतेच लग्न पार पडले. अभिनेत्री रश्मी पाटीलचादेखील नुकताच विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आता ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्याने लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे मालिकेत अश्विन सुभेदारची भूमिका साकारणारा प्रतीक सुरेश (Pratik Suresh).

अभिनेता प्रतीक सुरेश याने ३० मे रोजी त्याची मैत्रीण नयनसोबत लग्नगाठ बांधल्याचे समजते आहे. या लग्नसोहळ्याला मालिकेच्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दाबाडे हिने प्रतीकच्या लग्नाचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रतीक आणि नयनचे अभिनंदन केले आहे. अद्याप अभिनेत्याने कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही.

वर्कफ्रंटबद्दल...प्रतीक सुरेश बद्दल सांगायचे तर तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकात काम करत होता. अभिनयाच्या जोडीला त्याला गाण्याचीही विशेष आवड आहे. पृथ्वी थिएटरशी जोडल्या गेलेल्या प्रतिकने नाटकातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यातूनच त्याला जाहिरातीमध्ये झळकण्याची संधी मिळत गेली. कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत तो राचप्पाची भूमिका साकारताना दिसला. क्रिमीनल्स मधून तो पोलिसाच्या भूमिकेत झळकला होता. ठरलं तर मग या मालिकेतील अश्विनच्या भूमिकेतून घराघरात पोहचला आहे.